राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेसाठी समन्वय समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST2020-12-29T04:28:44+5:302020-12-29T04:28:44+5:30
हिंगोली : येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २८ डिसेंबर रोजी हिंगाेली तालुका पल्स पोलिओ समितीची बैठक घेण्यात आली. याबैठकीसाठी ...

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेसाठी समन्वय समितीची बैठक
हिंगोली : येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २८ डिसेंबर रोजी हिंगाेली तालुका पल्स पोलिओ समितीची बैठक घेण्यात आली. याबैठकीसाठी नायब तहसीलदार ए. पी. वडवाळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, डॉ. अलोक गट्टु, डॉ. कदम, डॉ. देशमुख यांच्यासह सहाय्यक गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकारी नर्सी, भांडेगाव, सीसरम, फाळेगाव उपकेंद्रांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
हिंगाेली तालुक्यातील ग्रामीण भागातील २३ हजार ११६ व शहरी १० हजार २०५ असे एकूण ३३ हजार ३२१ बालकांना रविवार, दिनांक १७ जानेवारी २०२१ रोजी लस देण्यासाठी २४४ बुथ स्थापन केले आहेत. यासाठी १४ मोबाईल टीम व १९ ट्रान्झीट टीम स्थापन केल्या आहेत. तसेच ६४४ बुथ कर्मचारी व ६८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये बसस्थानक, रेल्वे स्थानक, नवीन बांधकाम साईट, रस्त्याशेजारील पाले, विटभट्टया आदी ठिकाणी पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १६ जानेवारी रोजी सर्व शाळेत प्रभात फेरी काढून पोलिओ माेहिमेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. मोहिमेसाठी सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकांद्वारे आवाहन करण्यात येणार आहे. ५ वर्षांखालील बालकांना पोलचिट वाटप करण्यात येत आहेत. सर्व गावचे सरपंच, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य हे आपल्या गावात मोहिमेचे उद्घाटन करून बालकांना पोलिओ डोज पाजतील. या माेहिमेसाठी लसीचे पुरेसे डोस उपलब्ध आहेत. १७ जानेवारी २०२१ रोजीची पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
फाेटाे नं ०१