प्रशिक्षकाच्या मानधनासाठी लाच स्वीकारणारा मुख्याध्यापक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 19:10 IST2018-04-12T19:10:09+5:302018-04-12T19:10:09+5:30

 कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक  विजयकुमार केंद्रे याला पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना आज दुपारी रंगेहाथ पकडले.

The mastermind of the bribe acceptance bribe for the coach's honor | प्रशिक्षकाच्या मानधनासाठी लाच स्वीकारणारा मुख्याध्यापक अटकेत

प्रशिक्षकाच्या मानधनासाठी लाच स्वीकारणारा मुख्याध्यापक अटकेत

हिंगोली :  कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक  विजयकुमार केंद्रे याला पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना आज दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मुख्याध्यापक केंद्रे याच्या कार्यालयातच करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक केंद्रे यांनी क्रिडा प्रशिक्षकास मानधनाचा नऊ हजार रूपयाचा चेक देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयाची लाच मागितली होती. यानंतर चार हजार रूपयावर तडजोड झाली. यावरून आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हिंगोली जिल्हा लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून केंद्रेला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. शिक्षण क्षेत्रातील या लाचखोरीच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पो.उप अधिक्षक सुनिल जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.नितीन देशमुख, पो.नि.जितेंद्र पाटील,पोहेकॉ शेख उमर, अभिमन्यू कादे, महारूद्र काबाडे यांच्या पथकाने केली. 

Web Title: The mastermind of the bribe acceptance bribe for the coach's honor