शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे मनुष्यबळाची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

सध्या जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरमध्ये ८४२ रुग्ण दाखल आहेत. आठशेच्या पुढे गेलेली ही रुग्णसंख्या इतर जिल्ह्यांच्या मानाने खूप कमी ...

सध्या जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरमध्ये ८४२ रुग्ण दाखल आहेत. आठशेच्या पुढे गेलेली ही रुग्णसंख्या इतर जिल्ह्यांच्या मानाने खूप कमी वाटत असली तरीही येथील तोकडी यंत्रणा एवढ्याही रुग्णांचा सांभाळ करू लागली, यातच सर्व काही आले आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी जाहिराती काढल्या तरीही मनुष्यबळ मिळत नाही. डॉक्टरांची तर २५ टक्केही पदे भरली गेली नाहीत. कर्मचाऱ्यांची निवड झाली तरीही त्यातील अर्धे अजून रुजूच नाहीत. त्यामुळे आहे? त्या यंत्रणेवर आणखी किती ताण पडणार आहे? हा प्रश्न आहे. जिल्हा प्रशासनाने आता कौठा व सिद्धेश्वर येथील आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत नवीन ऑक्सिजन बेडेड सुविधेसाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यापूर्वी डॉक्टर व परिचारिकांची व्यवस्था करणेही गरजेचे आहे. काही केंद्रांवर आताच डॉक्टरचे तोंडही पहायला मिळत नाही. कर्मचारीच उपचार करतात. आमच्या समस्यांचे समाधान करायला कोणी नसल्याची ओरड होत आहे.

नांदेडप्रमाणे लूट होऊ नये

हिंगोली जिल्ह्यातही आता खासगी कोरोना केअर सेंटर सुरू झाले आहेत. ते पॅकेजेसही जाहीर करू लागले आहेत. मात्र अशा केंद्रांतही डॉक्टरांपेक्षा कर्मचाऱ्यांवरच भार असल्याचे रुग्ण सांगत आहेत. मात्र प्रतिष्ठेपोटी अशा रुग्णालयात भरती झालेल्या या उच्चभ्रूंना तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती सोसावी लागत आहे. रुग्ण असल्याने तक्रार करायला बाहेर येता येत नाही. तर शासकीय यंत्रणेचे यावर काय नियंत्रण राहणार आहे, हे अजून काही निश्चित दिसत नाही. याबाबतही जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना काढणे गरजेचे आहे. अन्यथा नांदेडप्रमाणे हिंगोलीतही लुटीची शक्यता नाकारता येत नाही. शुल्कासह सर्वच बाबींमध्ये प्रशासनाने पारदर्शकता आणणे गरजेचे आहे.

खासगीच्या नोंदी होतात तरी कुठे?

खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या व सोडलेल्या रुग्णांची संख्या अधूनमधून आरोग्य विभागाला जाग आली तर प्रेस नोटमध्ये येते. अन्यथा त्यांचा उल्लेखही नसतो. खासगीच्या या नोंदी होतात तरी कुठे? हा प्रश्न आहे.