शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : हिंगोली जिल्ह्यात कडककडीत बंद; बाळापुरात आंदोलकांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 12:43 IST

जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

हिंगोली : जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच रस्ते निर्जन होते. वाहनांचा तर पत्ताच नव्हता.

हिंगोली येथील आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. रस्त्यावरही वाहनांचा पत्ता नव्हता. गांधी चौकात आज पुन्हा मुंडन आंदोलन करण्यात आले. यामध्ये पन्नास ते साठ जणांनी शासनाच्या निषेधार्थ मुंडन केले. यावेळी सरकारविरोधी घोषणा मोठ्या प्रमाणात दिल्या जात होत्या.  तालुक्यात कनेरगाव नाका येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. अकोला बायपासवर टायर जाळून आंदोलकांनी रस्ता बंद केला होता. 

वसमत तालुक्यात रेल्वे रोकोवसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे रेल्वे रोको आंदोलन केले. अकोला-पूर्णा पॅसेंजर अडविण्यात आली. त्याचबरोबर कौठा येथे सात वाजता नांदेड-जिंतूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. वसमत शहरातही कडकडीत बंद होता. व्यापा-यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली होती. कुरुंदा, गिरगाव, हट्टा, हयातनगर, आंबा आदी मोठ्या गावांतही बंदला प्रतिसाद मिळाला.

प्रवाशांना खिचडी वाटपवसमत तालुक्यातील कौठा येथील आसना नदीच्या पुलावर प्रवासात अडकलेल्यांना आंदोलकांनी खिचडीचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

सेनगावात स्कूल बस जाळली सेनगव येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनास हिंसक वळण मिळाले. आंदोलकांनी स्कूल बस जाळल्याची घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. कडोळी येथे बसस्थानकावर टायर जाळून निषेध नोंदविण्यात आला. तर गारखेडा येथील युवकांनी कडोळी-भगवती रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको केला. सवना येथेही कडकडीत बंद पाळून रास्ता रोको केला. तर आंदोलकांनी रस्त्यावरच स्वयंपाक केला.

कळमनुरीतही बंद, नांदापूर रस्त्यावर खिचडी शिजलीकळमनुरी येथे रास्ता रोको करून बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर तालुक्यातील नांदापूर येथील टी पॉर्इंटवर रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून  रस्त्यावर खिचडी शिजविण्यात आली.  जवळपास दोन हजार आंदोलक रस्त्यावर उतरले होते. डोंगरकडा, हिवरा येथेही कडकडकीत बंद होता. डोंगरकड्यात राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मारला होता. जवळा पांचाळ येथेही गाव बंद केले.

बाळापुरात रक्तदानकळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जमलेल्या आंदोलकांनी रस्त्यावर रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम घेतला. त्याला प्रतिसादही मिळत होता. अगदी सुरुवातीलाच दहा ते पंधरा जणांनी रक्तदान केले. आंदोलकांनी रास्ता रोकोही केला.

औंढ्यातही बंद, रास्ता रोकोऔंढा नागनाथ येथेही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. याशिवाय जिंतूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. जवळा बाजार येथेही कडकडीत बंद पाळून नागेशवाडी ते झीरोफाटा रस्ता बंद करण्यात आला होता.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद