इतर कामांच्या ओझ्याखाली दबतोय शिक्षक, विद्यार्थ्यांचेही नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:56 IST2021-02-05T07:56:24+5:302021-02-05T07:56:24+5:30
एकशिक्षकी शाळांचे होतात बेहाल इतर शाळांत अनेक शिक्षकांमधून काही शिक्षकांना अशा कामासाठी नियुक्ती मिळाली तर निदान मुलांना शाळेत नियंत्रित ...

इतर कामांच्या ओझ्याखाली दबतोय शिक्षक, विद्यार्थ्यांचेही नुकसान
एकशिक्षकी शाळांचे होतात बेहाल
इतर शाळांत अनेक शिक्षकांमधून काही शिक्षकांना अशा कामासाठी नियुक्ती मिळाली तर निदान मुलांना शाळेत नियंत्रित करायला तरी कोणी असते. मात्र, एकशिक्षकी शाळेला थेट सुट्टीच द्यावी लागते. जिल्ह्यात अशा जवळपास २० शाळा असून, त्यांचे मात्र बेहाल होतात.
शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, असा शासन निर्णय आहे. मात्र, तरीही ही कामे लावली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. आमच्या संघटनेनेही या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधले आहे. मात्र, राष्ट्रीय काम असल्याचे सांगून कामाला लावले जाते.
रामदास कावरखे, म. रा. प्रा. शिक्षक संघ
काही राष्ट्रीय कार्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जातात. मात्र, त्याशिवायची कोणतीच अशैक्षणिक कामे दिली जात नाहीत. राष्ट्रीय कार्यावर परिणाम होऊ नये, यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार शिक्षकांना नियुक्त्या द्यावा लागतात.
संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी
निवडणुकीच्या कामांसाठी प्राधान्याने शिक्षकांना कामे लावली जातात. यात प्रशिक्षण, मतदान, मतमोजणीच्या दिवशी शाळा वाया जाते. पोलचीटही वाटाव्या लागतात.
जनगणनेच्या कामासह मतदार याद्यांचे काम करण्यासाठी बीएलओ म्हणूनही शिक्षकांनाच काम पाहावे लागते. यासाठीही त्यांना वेळ द्यावा लागतो.
आरोग्य विभागाची जंतनाशक गोळ्या वाटप मोहीम असो की, कोराेनातील काम, या ठिकाणीही शिक्षकांना कामाला लावले जाते. इतरही अनेक कामे आहेत.
८७९ जिल्ह्यातील जि. प. शाळा
३९७७ जि. प. शिक्षक
९६८३३ विद्यार्थीसंख्या