विजेचे धक्का बसल्याने लाईनमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 19:47 IST2018-05-04T19:47:32+5:302018-05-04T19:47:32+5:30
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे विद्युत खांबावर काम करत असताना लाईनमनचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११. ३० वाजता घडली.

विजेचे धक्का बसल्याने लाईनमनचा मृत्यू
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे विद्युत खांबावर काम करत असताना लाईनमनचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११. ३० वाजता घडली.
बापूराव सिताराम ढोले ( वय ४५ वर्षे) असे मयत लाईनमनचे नाव आहे. ते वारंगा फाटा येथील नवी आबादी येथे विद्युत खांबावर काम करत होते. काम करत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. यामुळे ते खांबावरून खाली पडले. उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला.ढोले हे नांदेड जिल्ह्यातील एकघर येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मूली, दोन मुले असा परिवार आहे.