शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

हिंगोलीत महिन्याभरात दुसऱ्यांदा लॉकडाऊन; २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत कडक संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 10:57 PM

Lockdown again in Hingoli : हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली, तरीही नागरिक मात्र त्या तुलनेत काळजी घेत नसल्याचे दिसून येत होते.

हिंगोली : कोरोनाचा कहर वाढताच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिनांक २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान ७ दिवसांची संपूर्ण संचारबंदी घोषित केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा रोजच शंभरवर राहात असून, मृत्यूही वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने अखेर संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली, तरीही नागरिक मात्र त्या तुलनेत काळजी घेत नसल्याचे दिसून येत होते. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या आता सव्वा सहाशेच्याही पुढे गेली आहे. आता या रुग्णांना योग्य सेवा देताना आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. अपुऱ्या यंत्रणेवर आरोग्य विभागाकडून रुग्णसेवा केली जात आहे. मात्र, यापेक्षा जास्त रुग्ण वाढले तर जिल्ह्यात अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून पुन्हा दिनांक २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान संचारबंदी घोषित केली आहे.

जिल्ह्याच्या हद्दीतील सर्व आस्थापना, दुकाने, खानवळी, आदी २९ मार्चच्या सकाळी ७ वाजल्यापासून ते ४ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. या कालावधीत दूध विक्री केंद्र, दूध विक्रेते यांना सकाळी ७ ते १० यावेळेत घरपोच सेवा देण्याची मुभा दिली आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका या कामकाजासाठी चालू राहतील. या कालावधीत बँका केवळ शासकीय कामकाजासाठी चालू राहतील. याकरिता संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी मुभा राहील. परंतु, सोबत ओळखपत्र ठेवणे बंधनकारक राहणार आहे. औषध दुकानेही चालू ठेवण्यास मुभा राहील. पत्रकार व त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्र ठेवून वार्तांकनाची मुभा आहे. रस्त्यांची कामे, महावितरण, महापारेषणची कामे, पाणीपुरवठा, दूरसंचारची कामे, स्वच्छता, परवानगीप्राप्त वाळू घाटातून वाळू वाहतुकीला मुभा राहणार आहे. पेट्राेल पंप सुरू राहणार असले, तरीही केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व कृषी सेवा संबंधित वाहनांनाच इंधन पुरवठा केला जाईल. संचाराची मुभा दिलेल्या व्यक्तिंना सामाजिक अंतर, मास्क वापरणे बंधनकारक राहील. याशिवाय इतर कोणीही रस्त्याने, बाजारामध्ये गल्लीत, गावामध्ये, घराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.

शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये, प्रवास बंदसंचारबंदीच्या या कालावधीत सर्व धार्मिक/प्रार्थनास्थळे, शाळा, महाविद्यालये, सर्व मंगल कार्यालये, लॉन्स बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, बाहेरील विद्यार्थी, परजिल्ह्यातील येथे अडकलेले नागरिक यांच्यासाठी परवानाधारक खानावळ, हॉटेल्स केवळ पार्सल सुविधेसाठी सकाळी ९ ते रात्री ७ यावेळेत उघडण्यास मुभा राहणार आहे. लग्न सोहळाही आयोजित करता येणार नसून, फक्त कोर्ट मॅरेजसाठी मुभा देण्यात आली आहे. प्रवासी बस वाहतुकीला जिल्हांतर्गत बंदी राहणार असून, इतर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसला मुभा असली, तरीही त्या फक्त बसस्थानकातच थांबतील. ई-काॅमर्स व कुरियर सेवा देण्यासही जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.

महिन्यात दुसऱ्यांदा टाळेबंदीमार्च महिन्याच्या सुरुवातीलाच रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी टाळेबंदी जाहीर केली होती. त्यावेळी फक्त अडीचशे सक्रिय रुग्ण होते. आता सक्रिय रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे ऐन ‘मार्च एंड’च्या तोंडावर पुन्हा एकदा टाळेबंदी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोली