कांडली शिवारात पुन्हा आढळला बिबट्या; शेतकरी भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 15:18 IST2020-12-29T15:17:47+5:302020-12-29T15:18:26+5:30
Hingoli Leopard News : ग्रामस्थ व वनविभागाचे पथक सर्व परिसर पिंजून काढत असताना सोपानराव देशमुख याच्या शेतात विहीर परिसरात पायाचे ठसे उमटलेले दिसले

कांडली शिवारात पुन्हा आढळला बिबट्या; शेतकरी भयभीत
आखाडा बाळापूर ( हिंगोली ) - कांडली शिवारात पुन्हा एकदा आज बिबट्याचे दर्शन झाले आहे. पुन्हा त्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. आज कांडली शिवारात सकाळी बिबट्या दिसला. ही बाब वनविभागाला कळविले. त्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी प्रिया साळवे यांनी भेट दिली.
कांडली या गावात बिबट्या आज सकाळी देविदास नरवाडे याच्या शेतात आढळून आला. त्यांनी राहुल पतंगे यांना माहिती दिली. त्यांनी साळवे यांना कळविले. त्या त्वरीत घटनास्थळी हजर झाल्या. ग्रामस्थ व वनविभागाचे पथक सर्व परिसर पिंजून काढत असताना सोपानराव देशमुख याच्या शेतात विहीर परिसरात पायाचे ठसे उमटलेले दिसले.
परिसरातील शेतकरी रात्री अप रात्री पाणी देण्यास जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पुन्हा एकदा बिबट्याचा वावर परिसरात आढळल्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.