जिल्हा परिषदेची गतवर्षीची कामे अजूनही निविदेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:28 AM2021-03-06T04:28:52+5:302021-03-06T04:28:52+5:30

यंदाची व मागची अशी ५१४ कामे हाती घेतली होती. यापैकी १२७ पूर्ण झाली आहेत, तर १३४ सुरू आहेत. तब्बल ...

Last year's work of Zilla Parishad is still in tender | जिल्हा परिषदेची गतवर्षीची कामे अजूनही निविदेतच

जिल्हा परिषदेची गतवर्षीची कामे अजूनही निविदेतच

Next

यंदाची व मागची अशी ५१४ कामे हाती घेतली होती. यापैकी १२७ पूर्ण झाली आहेत, तर १३४ सुरू आहेत. तब्बल २५५ कामे निविदेत आहेत. यात्रस्थळ विकासाची ६२ पैकी २५ पूर्ण, तर २९ निविदेत, पर्यटनस्थळ विकासाची ३ कामे पूर्ण झाली. प्रादेशिक पर्यटनची ५ पैकी ४ निविदेत व एक सुरू झाले. ग्रामीण रस्ते व पुलाची ५७ पैकी २४ पूर्ण, ७ सुरू, तर २६ निविदेत आहेत. इतर जिल्हा रस्ते विकासाची ६३ पैकी ९ पूर्ण, ३५ सुरू, तर १९ निविदेत आहेत. प्राथमिक आरोग्य केेंद्र बांधकामाची ५ पैकी २ कामे पूर्ण व २ सुरू, १ निविदेत आहे, तर यातील दुरुस्तीची ९ पैकी ८ कामे पूर्ण झाली. माध्यमिक शाळेची ३ पैकी २ कामे सुरू आहेत. एक पूर्ण झाले. नावीन्यपूर्ण योजनेत विद्युतीकरणातील १९ कामे सुरू आहेत. अंगणवाडी इमारत बांधकामाची ३५ पैकी २८ कामे सुरू आहेत. सात निविदेत आहेत. अंगणवाडी दुरुस्तीची १५२ कामे निविदेतच आहेत. या सर्व योजनांसाठी कोट्यवधींची तरतूद झालेली आहे. मात्र ती वेळेत खर्च होत नसल्याची बोंब दरवर्षीप्रमाणे यंदाही कायम आहे.

Web Title: Last year's work of Zilla Parishad is still in tender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.