हिंगोली जिल्हा रुग्णालयात वाटप केलेल्या आहारात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:27 AM2021-08-01T04:27:35+5:302021-08-01T04:27:35+5:30

हिंगोली जिल्हा रुग्णालयात ३० रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास रुग्णांना दोन पोळ्या, वरण, भात व सोयाबीन वडी या आहाराचे ...

Larvae in the diet distributed at Hingoli District Hospital | हिंगोली जिल्हा रुग्णालयात वाटप केलेल्या आहारात अळ्या

हिंगोली जिल्हा रुग्णालयात वाटप केलेल्या आहारात अळ्या

Next

हिंगोली जिल्हा रुग्णालयात ३० रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास रुग्णांना दोन पोळ्या, वरण, भात व सोयाबीन वडी या आहाराचे वाटप केले. तेव्हा बालरोग वाॅर्डात दाखल असलेल्या अरमान सुभान चौधरी याला दिलेल्या आहारात अळ्या असल्याचे त्याची आई रेहाना यांना दिसले. याबाबत त्यांनी तक्रार केली तर वाटप करणाऱ्याने काही होत नाही, एखादेवेळी आली असेल असे मोघम उत्तर दिले तर आणखी अळ्या आढळल्या. त्यामुळे त्यानी संबंधित अधिपरिचारिका दीपाली अंभोरे व शुभांगी दराडे यांच्याकडे तक्रार दिली. त्यांनीही पाहणी केली तर गंभीर प्रकार आढळला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे याची तक्रार केली. त्यांनीही प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच स्वयंपाकगृहासही भेट दिली. तेव्हा तेथे स्वच्छतेचा अभाव आढळला. उरलेल्या सोयाबीनच्या भाजीतही अळ्या आढळल्या. याबाबत जि.प.उपाध्यक्ष मनीष आखरे यांच्याकडेही तक्रार गेली होती. त्यांनी राकाँ युवक जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, अजिम प्यारेवाले यांना पाठवून जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली.

त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी यांनी यातील आहार व्यवस्थापक इंगळे यांना बदलून यशोधरा महिला औद्योगिक सहकारी संस्था नाशिक यांचा पुरवठा आहार पुढील निर्णयापर्यंत बंद करण्याचा आदेश दिला. तसेच जिल्हा रुग्णालय परिसरात शिवभोजन थाळी केंद्रास पुरवठा करण्यास सांगितले. याबाबतचा अहवाल आरोग्य उपसंचालकांनाही पाठविण्यात आला आहे.

Web Title: Larvae in the diet distributed at Hingoli District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.