विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या जीपला हिंगोलीत अपघात; तिघे किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 18:40 IST2018-01-30T18:37:02+5:302018-01-30T18:40:16+5:30
शाळकरी मुलांना घेऊन जाणारी जीप अचानक खड्यात पडून अपघात झाल्याची घटना शहरातील नाईक नगर येथे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. यात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. विना परवाना विद्यार्थ्यांची वाहतूक केल्या प्रकरणी चालका विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या जीपला हिंगोलीत अपघात; तिघे किरकोळ जखमी
हिंगोली : शाळकरी मुलांना घेऊन जाणारी जीप अचानक खड्यात पडून अपघात झाल्याची घटना शहरातील नाईक नगर येथे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. यात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. विना परवाना विद्यार्थ्यांची वाहतूक केल्या प्रकरणी चालका विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
औंढा नागनाथ ते हिंगोली या मार्गावर एक जीप विद्यार्थ्यांची वाहतूक करते. आज सकाळी जीप शहरात नाईकनगर परिसरात दाखल होताच त्यात अचानक बिघाड झाला. यातच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या बाजूस असलेल्या खड्यात गेली. यात जीपमधील तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच फौजदार तानाजी चेरले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परवाना नसतानाही शालेय मुलांची वाहतूक वाहतूक केल्याप्रकरणी जीप चालक विलास शिंदे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.