शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST

हिंगोली : कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी शासनाने मिनी लॉकडाऊन घोषीत केले आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ...

हिंगोली : कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी शासनाने मिनी लॉकडाऊन घोषीत केले आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे घरातील आर्थिक गणित बिघडले असून अशीच परिस्थिती राहिल्यास गळ्यातील सोनेही मोडावे लागणार असल्याची संतप्त प्रतिक्रीया महिलांतून व्यक्त होत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यात संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे जवळपास पंधरा दिवस व्यवसाय ठप्प पडला होता. त्यानंतर पुन्हा शासनाने ब्रेक द चेन लागू केले आहे. अगोदरच वर्षभरात केवळ दोनच महिने व्यवसाय करण्यास संधी मिळाली. आता कुठे लग्न सराई, सण, उत्सव सुरू झाले होते. मात्र पुन्हा दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने व्यवसायात उधारी, उसनवारी, कर्ज घेऊन गुंतवलेला पैसाही अडकून पडला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. गुंतवलेला पैसा कसा काढावा याची चिंता लागली आहे. याचा परिणाम घरावरही पडत असून गृहिणीसमोरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही दिवस असेच चित्र राहिले तर गळ्यातील चेन मोडायची वेळ येईल, अशा संतप्त प्रतिक्रीया व्यावसायिकांच्या घरातील गृहिणींमधून व्यक्त होत आहेत.

कर्ज कसे फेडायचे याची लागली चिंता

गतवर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. मध्यंतरी ही संख्या कमी झाल्याने व्यवसाय सुरू झाले होते. त्यानंतर केवळ दोनच महिने खऱ्या अर्थाने व्यवसाय सुरळीत झाला होता. आता पुन्हा व्यवसाय बंद झाल्याने हप्ते, मुलांचा खर्च, विविध कर कसे भरायचे यांची चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे.

६० दिवसच वर्षभरात जिल्ह्यातील व्यवसाय खऱ्या अर्थाने सुरू होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे. घराचे हप्ते, दुकानाचे भाडे, मुलांचा खर्च कसा करावा, याचीच चिंता लागली आहे.

- जी.एन. अग्रवाल (गृहिणी)

कोरोनामुळे व्यवसाय ठप्प पडल्याने व्यवसायात गुंतवलेला पैसा अडकून पडला आहे. परिणामी घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात सर्वच कर भरावे लागत असल्याने दुकानाचे भाडे व कर कसे भरावेत, ही चिंता भेडसावत आहे.

- भावना संचित गुंडेवार,

खाजगी कर्ज काढून व्यवसायत पैसा गुंतविला आहे. आता हे कर्ज कसे फेडायचे, घर कसे चालवायचे, मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करायचे, याची चिंता लागली आहे. शासनाने बाजारपेठ खुली करावी.

-मंजूषा पवन मुंदडा,

कर्ज काढून व्यवसायात पैसा गुंतविला आहे. त्यात संचारबंदीने व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्यात कोणतेच कर माफ केले नाहीत. त्यामुळे जगायचे कसे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. -

- अश्वीनी किशोर गुंडेवार

फाेटाे नं. २४