शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कमरेची पिस्तूल खरी आहे का? विचारताच सेवानिवृत्त सैनिकाने थेट हॉटेलमध्ये झाडली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 11:58 AM

सेवानिवृत्त सैनिका विरोधात बाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

- रमेश कदम

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : बोल्डा फाटा येथील एका हॉटेलवर सेवानिवृत्त सैनिक आला. हॉटेलमध्ये बोलत उभा असताना  त्याच्या कमरेला ' पिस्तुल' असल्याचे दिसले. उत्सुकतेपोटी हॉटेल चालकाने पिस्तुल खरी आहे का ? असे विचारले. तर त्या सेवानिवृत्त सैनिकाने पिस्तुल काढत थेट हॉटेलमध्येच हवेत गोळी झाडली. या प्रकरणाने भेदरलेल्या हॉटेल चालकाने ही बाब पोलिसांना कळवून याप्रकरणी फिर्याद दिली. बाळापूर पोलीस ठाण्यात निवॄत्त सैनिकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.  

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बाळापुर पोलीस ठाणे हद्दीतील बोल्डा फाटा ते उमरी जाणाऱ्या रस्त्यावर नंदकुमार गोविंदराव मंदाडे यांचे हॉटेल लीला बार अँड रेस्टॉरंट नावाचे हॉटेल आहे. दिनांक 28 मे रोजी ते हॉटेलवर असताना सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान सेवानिवृत्त सैनिक साहेबराव धोराजी रणवीर व त्यांच्यासोबत इतर दोघे हॉटेलमध्ये आले. हॉटेलच्या उजव्या बाजूला थांबून एकमेकांसोबत बोलत होते. दरम्यान, रणवीर यांच्या कमरेला पिस्तूल दिसले. यामुळे हॉटेल चालकाने उत्सुकतेपोटी पिस्तुल खरे आहे का? असे विचारले. तेव्हा रणवीर यांनी कमरेचे पिस्तूल काढत थेट हॉटेलमध्येच हवेत गोळी झाडली. अचानक गोळीबार झाल्याने हॉटेल मालकासह सर्वजण भयभीत झाले. काही वेळाने सेवानिवृत्त सैनिक रणवीर देखील तेथून गेले. परंतु, या प्रकाराने उपस्थितांमध्ये भीती निर्माण झाली. 

या प्रकरणी नंदकुमार गोविंदराव मंदाडे यांच्या तक्रारीवरून सेवानिवृत्त सैनिक साहेबराव धुराजी रणवीर (राहणार पोतरा ) याच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 268, 336 व भारतीय हत्यार कायद्याच्या सहकलम 30 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पिस्तुल ही लायसन असलेली असून विनाकारण हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली म्हणून गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी दिली आहे. पिस्तुल पोलिसांनी जप्त केले असून हिंगोली शहर ठाण्यात जमा केले आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सेवानिवृत्त सैनिकास ताब्यात घेतले होते. चौकशी करून त्याला सोडण्यात आले असल्याची माहिती बोधनापोड यांनी दिली आहे. विनाकारण झालेल्या गोळीबाराची चर्चा मात्र जिल्हाभरात पसरली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीPoliceपोलिस