बोगस वारसा फेर प्रकरणाची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:35 IST2021-08-18T04:35:29+5:302021-08-18T04:35:29+5:30

निवेदनात म्हटले की, वडिलांच्या निधनानंतर घराचा वारसा फेर करण्यासाठी विहित नमुन्याच्या अर्जासोबत शपथपत्र व काही रकमेचा भरणा ग्रामसेवकाकडे केला. ...

Investigate the bogus inheritance case | बोगस वारसा फेर प्रकरणाची चौकशी करा

बोगस वारसा फेर प्रकरणाची चौकशी करा

निवेदनात म्हटले की, वडिलांच्या निधनानंतर घराचा वारसा फेर करण्यासाठी विहित नमुन्याच्या अर्जासोबत शपथपत्र व काही रकमेचा भरणा ग्रामसेवकाकडे केला. त्यानुसार, सप्टेंबर, २०१९ मध्ये तत्कालीन ग्रामसेवकांनी विकास इंगळे व रानोजी इंगळे या दोन नावाने नमुना नं. ८ च्या प्रती वारसाफेर नं. करिता दिल्या. या वारसा फेरची सत्यता नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेवकाकडे केली असता, या वारसाफेरची कार्यालयीन दप्तरात कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याचे त्यांनी सांगितले, तसेच दिलेले नमुना नं. ८ बोगस असल्याचे सांगितले. या प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकाने केलेल्या वारसाफेरची चौकशी करून वारसाफेर नव्याने करण्याचे आदेश द्यावेत, तसेच त्यांच्या काळात झालेल्या दलित वस्ती विकास निधी वापरासंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनात विकास इंगळे यांनी केली आहे.

Web Title: Investigate the bogus inheritance case