शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुद्रा बँक योजनेंतर्गत कर्ज वाटपाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:17 IST

मुद्रा बँक योजने अंतर्गत सर्व बँकांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पात्र कर्ज मंजूर करण्याचे निर्देश मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मुद्रा बँक योजने अंतर्गत सर्व बँकांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पात्र कर्ज मंजूर करण्याचे निर्देश मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत जयवंशी बोलत होते. यावेळी अशासकीय सदस्य माजी. आ. गजानन घुगे, सुरजितसिंग ठाकूर, बाबाराव घुगे, भारत लोखंडे, कौशल्य विकास विभागाच्या रेणुका तम्मलावार, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक शांताराम सौदल्लू, आरसीटीचे संचालक प्रवीण दीक्षित, आणि मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की जिल्ह्यातील बँकांना शिशु, किशोर आणि तरुण गटनिहाय मुद्रा बँक योजनेंतर्गत कर्ज वितरणाचे ठरवून दिलेले उद्दिष्ट पुर्ण करुन लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करावीत. काही बँकानी चांगले काम केले असून इतर बँकांनी उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. बँकांनी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त तरुणांना या योजनेचा लाभ देऊन स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी प्रयत्न लाभार्थ्यांचा संवेदनशीलपणे विचार करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी यावेळी दिल्या.सर्व बँक व्यवस्थापकांनी मुद्रा बँक योजने अंतर्गत प्राप्त झालेली प्रकरणे मंजूर करुन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ द्यावा असे सर्व अशासकीय सदस्यांनी यावेळी सांगितले.प्रारंभी जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समितीवर निवड झालेल्या सर्व अशासकीय सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बैठकीस सर्व बँक व्यवस्थापकांची उपस्थिती होती. यावेळी मुद्रा बँक योजनेची माहिती सादर करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हा नियोजन अधिकारी यांनी माहिती सादर केली. यामध्ये मुद्रा बँक योजने अंतर्गत १५ डिसेंबर पर्यंत शिशु गटात २३६३ लाभार्थ्यांना ५ कोटी ६२ लाख रुपये, तसेच किशोर गटामध्ये ७९३ लाभार्थ्यांना १९ कोटी ६३ लाख रुपये आणि तरुण गटात १९७ लाभार्थ्यांना १४ कोटी ४१ लाख असे एकुण ३,३५३ लाभार्थ्यांना ३९ कोटी ६६ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली