पोलीस महानिरीक्षकांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे केले कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST2021-01-08T05:37:57+5:302021-01-08T05:37:57+5:30
वार्षिक तपासणीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक वसमत दौऱ्यावर आले होते. ग्रामीण पोलीस ठाण्याला त्यांनी भेट देऊन तपासणी केली. कर्मचाऱ्यांशी संवाद ...

पोलीस महानिरीक्षकांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे केले कौतुक
वार्षिक तपासणीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक वसमत दौऱ्यावर आले होते. ग्रामीण पोलीस ठाण्याला त्यांनी भेट देऊन तपासणी केली. कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ग्रामीण ठाण्याचा कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले. सपोनि विलास चवळी यांचे पोलीस महानिरीक्षकांनी विशेष कौतुक केले. शहर पोलीस ठाण्यात आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय पोलीस अधिकारी वसीम हाश्मी, पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, सपोनि विलास चवळी, पोउपनी आवडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी शहर पोलीस ठाण्यास आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे, त्याबद्दल समाधान व्यक्त करून जनतेची कामेही त्याच पद्धतीने झाली पाहिजेत, असे सांगितले. कार्यक्रमाला नागरिक, व्यापारी उपस्थित होते.