जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेने जखमीला मिळाले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:33 IST2021-08-13T04:33:47+5:302021-08-13T04:33:47+5:30

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत १२ ऑगस्ट रोजी लिंबाळा मक्ता येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात एका कार्यक्रमाचे ...

The injured were treated by the District Collector | जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेने जखमीला मिळाले उपचार

जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेने जखमीला मिळाले उपचार

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत १२ ऑगस्ट रोजी लिंबाळा मक्ता येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह इतर पदाधिकारी, अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर मंत्री उदय सामंत यांचा ताफा निघाला होता. याच वेळी लिंबाळा मक्ता परिसरात एका दुचाकी अपघातात एकजण जखमी होऊन रस्त्यावर पडला होता. काही जणांनी रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र, रुग्णवाहिका लवकर येत नव्हती. त्याच वेळी प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी त्यांचे वाहन थांबविले. त्यांनी तत्काळ शासकीय वाहनातून जखमी व्यक्तीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. दरम्यान, जखमी व्यक्तीचे नाव मात्र समजू शकले नाही.

Web Title: The injured were treated by the District Collector