शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन अनुशेषासाठी कयाधू नदीपात्रात संघर्ष समितीचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 16:55 IST

आंदोलकांनी प्रजासत्ताक दिन कयाधू पात्रातच साजरा करण्याची भूमिका घेतली आहे

कळमनुरी ( हिंगोली ) : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यात यावा, कयाधू नदीवर बंधारे बांधावेत, सापळी धरण रद्द करावे, जिल्ह्याला सिंचनासाठी निधी द्यावा, ईसापूर धरणातील पाणी तालुक्याला देण्यात यावे, खरबी बंधारा रद्द करावा आदीं मागण्यांसाठी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांच्यासह अनेकजण सालेगाव येथील कयाधू नदीपात्रात आज सकाळी १० वाजेपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. परिसरातील गावातील ग्रामस्थांनी या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला आहे. 

जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी कयाधू नदीवर बंधारे बांधावेत, तसेच खरबी येथे बंधारा बांधून त्याचे पाणी इसापूर धरणात सोडू नये, सापळी धरण रद्द करावे यासह इतर मागण्यांसाठी सिंचन संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. माजी खासदार माने यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून परिसरातील दोन गावातील नागरिक दररोज साखळी उपोषण करून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.याप्रसंगी हरिभाऊ झाकलवाडे, डिगांबर कदम, दादाराव मुंडे, सदाशिव चौतमल, वसंतराव पतंगे, रामकिशन ठाकूर, शेषराव पतंगे, गजानन काळे, राम पाटील, जनार्धन गुठ्ठे, आनंद डाढाळे, शिवाजी काळे, शिवाजी गुठ्ठे आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. दरम्यान, शासनाकडून जोपर्यंत ठोस उपाययोजना हाती घेतल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुचं राहणार असल्याचे आंदाेलनकर्त्यांनी सांगितले.

प्रजासत्ताक दिन कयाधू पात्रातच साजरा करण्याचा निर्णयसिंचनाच्या बाबतीत हिंगोली जिल्ह्यावर वेळोवेळी अन्याय केला जात आहे. सिंचन अनुशेष असतांनाही बंधाऱ्यांचे प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत. एकीकडे बंधारे बांधले जात नाही तर दुसरीकडे कयाधूचे पाणी खरबी बंधारा बांधून इसापूर धरणात सोडण्याचे प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरु आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्याचा वाळवंट होईल. शासनाने सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत, या मागणीसाठी बेमुद्दत उपोषण सुरु आहे. निर्णय झाला नाही तर प्रजासत्ताक दिन कयाधू पात्रातच साजरा करण्यात येणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. 

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीriverनदीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प