भाजीपाल्याची आवक वाढली; भावात चढ-उतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:27 IST2021-03-15T04:27:28+5:302021-03-15T04:27:28+5:30

यंदा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भाजीपाला लागवड जास्त प्रमाणावर केल्यामुळे मंडईत सलग तीन आठवड्यांपासून भाजीपाल्यांची आवक आहे. या आठवड्यात भाजीपाला ...

Increased vegetable arrivals; Fluctuations in prices | भाजीपाल्याची आवक वाढली; भावात चढ-उतार

भाजीपाल्याची आवक वाढली; भावात चढ-उतार

यंदा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भाजीपाला लागवड जास्त प्रमाणावर केल्यामुळे मंडईत सलग तीन आठवड्यांपासून भाजीपाल्यांची आवक आहे. या आठवड्यात भाजीपाला थोडा-फार महागला आहे. या आठवड्यात कोंथिबिरीच्या भावाने कळस गाठत १० रुपये छटाक दराने विक्री होत आहे. याचबरोबर लसन ८० तर कैरी ७० रुपये किलोने विक्री हाेत आहे.

रविवारी शहरातील भाजीमंडईमध्ये टोमॅटो १५ रुपये किलो, कांदा ३०, आलू १५ ते २०, मिरची ३०, गाजर ३०, वांगी ३० ते ३५ रुपये दराने विकल्या जात आहेत, तसेच बाजारात शेवग्याच्या शेंगा, काकडी आदींची आवक वाढलेली आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे ग्राहक शरबत करण्यासाठी लिंबाची खरेदी करीत असून, लिंबाचाही भाव वाढला असून, १० रुपयांमध्ये दोन लिंबे ग्राहकांना मिळत आहेत.

Web Title: Increased vegetable arrivals; Fluctuations in prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.