शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

HSC Result : हिंगोली जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलीच सरस; निकाल ८८.२३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 17:21 IST

हिंगोली जिल्ह्यात बारावीच्या विज्ञान शाखेसाठी ४४१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ४३८0 जणांनी परीक्षा दिली.

ठळक मुद्देपुरवणी परीक्षेचा निकाल ३९.५८ टक्केतालुक्यांमधून सेनगाव अव्वल

हिंगोली : जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८८.२४ टक्के लागला असून औरंगाबाद विभागीय मंडळात जिल्हा जालना व बीडपाठोपाठ तिसऱ्या स्थानी आहे. यंदाही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे.

हिंगोली जिल्ह्यात बारावीच्या विज्ञान शाखेसाठी ४४१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ४३८0 जणांनी परीक्षा दिली. यातील १७१ विशेष प्राविण्यात, १८२९ प्रथम श्रेणीत, २१३0 द्वितीय श्रेणीत तर अवघे ४८ जण काठावर उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ९५.३९ टक्के लागला आहे. कला शाखेचे ६७५४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. यापैकी ६६७0 जणांनी परीक्षा दिली. यातील ३८१ विशेष प्राविण्यात, २७१५ प्रथम श्रेणीत, २३६८ द्वितीय श्रेणीत तर ९१ जण काठावर उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ८३.२८ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेसाठी ९0४ जणांनी अर्ज भरले होते. यापैकी ९0२ जणांनी परीक्षा दिली. २२0 जण विशेष प्राविण्यात, ४३३ प्रथम श्रेणीत, २0६ द्वितीय श्रेणीत, ८ काठावर उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा सर्वाधिक ९६.१२ टक्के निकाल लागला आहे. बारावीच्या किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाला ३२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.यापैकी ३२८ जणांनी परेक्षा दिली. १५ विशेष प्राविण्यात, १५३ प्रथम तर १0५ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ८३.२३ टक्के लागला.

पुरवणी परीक्षेचा निकाल ३९.५८ टक्केहिंगोली जिल्ह्यात पुरवणी परीक्षेस विज्ञान शाखेचे २४१ पैकी २३८ जण परीक्षेस बसले. २ प्राविण्यात, ४८ प्रथम श्रेणीत, ३२ द्वितीय तर ६८ काठावर उत्तीर्ण झाले. कला शाखेच्या सर्व ५६३ जणांनी परीक्षा दिली. यापैकी ३ प्रथम श्रेणीत, ९ द्वितीय तर १५८ काठावर उत्तीर्ण झाले. वाणिज्यच्या १२ ही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ५ काठावर उत्तीर्ण झाले. किमान कौशल्य अभ्यासक्रमांच्या ३६ पैकी ११ जणांना काठावर यश मिळाले.

मुलींच्या उत्तीर्णतेचा टक्का जास्तमुलींच्या उत्तीर्णतेचा टक्का यंदाही मुलांपेक्षा जास्तच आहे. यंदा जिल्ह्यात सर्व शाखांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ हजार ४0५ आहे. यापैकी १२२८0 जणांनी परीक्षा दिली असून १0८७३ जण उत्तीर्ण झाले. यापैकी ५८९३ मुले तर ४९८0 मुली आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.९७ तर मुलींचे ९३.१७ आहे.

तालुक्यांमधून सेनगाव अव्वलतालुकानिहाय निकालाचा विचार केला तर सेनगाव तालुका अव्वल राहिला आहे. हिंगोली तालुक्यात नोंदणी केलेल्या २८५0 पैकी २८१२ जणांनी परीक्षा दिली. यातील २३९१ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे ८५.0३ टक्के आहे. कळमनुरी तालुक्यात नोंदणी केलेल्या २५७२ पैकी २५५८ जणांनी परीक्षा दिली. यातील २२८९ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ८९.४८ टक्के आहे. वसमत तालुक्यात नोंदणी केलेल्या ३९२५ पैकी ३८८७ जणांनी परीक्षा दिली. यापैकी ३४७६ जण उत्तीर्ण झाले.हे प्रमाण ८९.४३ टक्के आहे. सेनगाव तालुक्यात नोंदणी केलेल्या १६८३ पैकी १६६१ जणांनी परीक्षा दिली. तर १४९५ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९0.0१ टक्के असून जिल्ह्यात सर्वाधिक आहे. औंढा तालुक्यात नोंदणीच्या १३७५  पैकी १३६२ जणांनी परीक्षा दिली. यापैकी १२२२ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ८९.७२ टक्के आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीHingoliहिंगोली