उन्हाचा पारा वढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:30 IST2021-03-16T04:30:47+5:302021-03-16T04:30:47+5:30
वीज खंडित; शेतकरी त्रस्त कळमनुरी : ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना ...

उन्हाचा पारा वढला
वीज खंडित; शेतकरी त्रस्त
कळमनुरी : ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना तसेच भाजीपाल्यांना पाणी देणे कठीण झाले आहे. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
राज्य रस्त्यावर खड्डे; वाहनचालक त्रस्त
औंढा नागनाथ : हिंगोली ते औंढा या राज्य रस्त्यावर काही ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी रस्ता काढून दिला आहे. परंतु, त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे वाहने चालविताना करत करावी लागत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन पर्यायी रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनालकांनी केली आहे.
वानरांचा उच्छाद
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस व परिसरात वानरांनी उच्छाद मांडला आहे. रब्बी हंगामातील पिके तसेच भाजीपाला फस्त करून नासाडी करीत आहेत. वन विभागाने याची दखल घेऊन वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
गतिरोधकाची मागणी
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा येथील वाहनांची वर्दळ पाहता अपघात घडून येत आहेत. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगण्यात आले, परंतु, अद्याप तरी कोणीही लक्ष दिलेले दिस नाही. राज्य रस्ता असल्याने या ठिकाणी गतिरोधक बसवावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
बसस्थानकात कचरा
कळमनुरी : येथील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचरा साचलेला पाहायला मिळत आहे. थोडे जरी वारे सुटले तरी कचरा प्रवाशांच्या अंगावर येत आहे. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवून प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी होत आहे.