शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Hingoli: चोरटी वाळू वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकावर तस्करांचा हल्ला; तलाठी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:20 IST

Hingoli News: वसमत तालुक्यात गत अनेक महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक राजरोसपणे सुरु आहे.

Hingoli News: वसमत (हिंगोली): शहरासह तालुक्यात नांदेड जिल्ह्यातील वाळूमाफिये चोरटी वाळू वाहतूक सर्रासपणे करत आहेत. या वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एक तलाठी गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर जवळपास चार कर्मचाऱ्यांना भीतीपोटी घटनास्थळावरुन काढता पाय घ्यावा लागला. वाळूमाफीयांची गुंडगिरी वाढल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास  घडली.

वसमत तालुक्यात गत अनेक महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक राजरोसपणे सुरु आहे.  या वाळू तस्करीच्या दलालांची संख्या वसमत तालुक्यात झपाट्याने वाढत आहे. १८ मार्च रोजी रात्री १२:३० वाजेदरम्यान मालेगाव मार्गावरील पळसगाव शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या टिप्परला गस्तीवरील महसूल पथकाने रोखले. यावेळी टिप्पर चालकाने निळा मार्गावर टिप्पर पळविले. त्या टिप्परचा पथकाने पाठलाग केला. याचवेळी वाळूमाफियांनी महसूल पथकावर  हल्ला करण्यात आला,या हल्ल्यात तलाठी नागनाथ राऊत यांच्या डोक्यावर गंभीर मार लागला. त्यामुळे ते अत्यवस्थ झाले. यावेळी हल्लेखोर आपल्यालाही मारतील या भितीपोटी इतर चार कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करणे सोडले. यानंतर गंभीर जखमी तलाठी राऊत यांना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महसूल पथकावर हल्ला झालेले ठिकाण नांदेड जिल्ह्यात येत असल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले. 

चोरटी वाळू विक्री दलाल वाढलेझटपट मालामाल कसे होता येईल हे डोळ्यासमोर ठेऊन काहीजण वाळू तस्करीत गुंतले आहेत. तालुक्यातील चोरटे मार्ग माहित असलेले काहीजण वाळू कशाप्रकारे विक्री करता येईल याच्या वाटा शोधत आहेत. काहीजण नांदेडच्या वाळूमाफियांना हाताशी धरत वाळू तस्करीत उतरले आहेत. ही मंडळी रात्री घातक शस्त्रे घेऊन वावरत असून याचाही प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होतघ आहे.

घटनेचा महसूल कर्मचाऱ्यांनी केला निषेधमंगळवारी रात्रीच्या सुमारास तलाठ्यावर वाळूमाफीयांनी हल्ला केला. या घटनेचा महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेने निषेध केला आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीsandवाळू