हिंगोलीत शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याच्या पतीची अभियंत्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 14:03 IST2019-02-28T14:00:57+5:302019-02-28T14:03:53+5:30

माऊली झटे आणि अभियंता आर.ए.कुंभारीकर यांच्यात नेमका काय वाद झाला हे अद्याप कळू शकले नाही.

In Hingoli; Shiv Sena Zilla Parishad member's husband beaten engineer | हिंगोलीत शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याच्या पतीची अभियंत्याला मारहाण

हिंगोलीत शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याच्या पतीची अभियंत्याला मारहाण

हिंगोली :  जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी अभियंता आर. ए. कुंभारीकर यांना माऊली झटे यांनी मारहाण केल्याची घटना आज दुपारी 1 वाजता त्यांच्या दालनात घडली. माऊली झटे हे औंढा तालुक्यातील उखळी सर्कलच्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या सिंधुताई झटे यांचे पती आहेत. 

माऊली झटे आणि अभियंता आर.ए.कुंभारीकर यांच्यात नेमका काय वाद झाला हे अद्याप कळू शकले नाही. सध्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे यांच्या दालनात सर्व अधिकारी आणि राजकीय पुढारी या प्रकरणावर चर्चा सुरु करत आहेत. बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. सर्व कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

Web Title: In Hingoli; Shiv Sena Zilla Parishad member's husband beaten engineer