शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

हिंगोलीत नर्सी नामदेव, बासंब्याचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 3:09 PM

सोडतीचे कार्यालयाबाहेर दूरचित्रवाणी संचावर थेट प्रसारण केले.

ठळक मुद्देअनुसूचित जातीसाठी एकूण १८ गावांचे सरपंचपद राखीव झाले आहे.इतर मागासप्रवर्गासाठी एकूण ३० ग्रामपंचायती राखीव आहेत.

हिंगोली :  तालुक्यातील १११ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या उपस्थितीत पार पडली. यात तालुक्यातील मोठ्या ग्रा.पं.पैकी नर्सी नामदेव, बासंबा या ठिकाणचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे. हिंगोली तालुक्यातील या प्रक्रियेसाठी चोरमारे यांच्यासह तहसीलदार पांडुरंग माचेवाड आदी उपस्थित होते. 

सोडतीचे कार्यालयाबाहेर दूरचित्रवाणी संचावर थेट प्रसारण केले. गर्दी टाळण्यासाठी हा उपाय करण्यात आला होता. अनेक गावांतील इच्छुक यावेळी उपस्थित होते. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण १८ गावांचे सरपंचपद राखीव झाले आहे. यात अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी अंभेरी, उमरा, कनका, काळकोंडी, खडकद बु., खांबाळा भांडेगाव, माळधामणी, वैजापूर तर याच प्रवर्गातील महिलेसाठी इडोळी, कडती, कोथळज, खानापूर चित्ता, गिलोरी, जोडतळा, ब्रह्मपुरी, समगा, हनवतखेडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अनुसूचित जमातीसाठी ८ ग्रा. पं. सुटल्या आहेत. यापैकी डिग्रसवाणी, देवठाणा, पेडगाव व बोराळवाडी या जमातीच्या सर्वसाधारण तर अंधारवाडी, फाळेगाव, राजुरा व लोहरा या अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. 

इतर मागासप्रवर्गासाठी एकूण ३० ग्रामपंचायती राखीव आहेत. यामध्ये ओबीसी सर्वसाधारणसाठी घोटा, पिंपळखुटा, बळसाेंड, सिरसम बु., मालवाडी, राहोली बु., लिंबळा म., लिंबी, लोहगाव, संतूक पिंपरी, सरकळी, दाटेगाव, आडगाव, जामठी खु., कळमकोंडा बु., तर ओबीसी महिलांसाठी कन्हेरगाव नाका, कलगाव, चोरजवळा, टाकळी त.ना., पिंपळदरी त.बा., भटसावंगी तांडा, माळसेलू, लिंबाळा प्र.वा., सावरगाव बंगला, देऊळगाव रामा, उमरखोजा, हिवरा बेल, दुर्गसावंगी, चिंचाळा, बोराळा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी २७ तर याच प्रवर्गातील महिलांसाठी २८ ग्रामपंचायती सुटल्या आहेत. सर्वसाधारणमध्ये आंबाळा, केसापूर, खेर्डा, खेड, गाडीबोरी, जयपूरवाडी, जांभरुण आंध, नर्सी नामदेव, पातोंडा, पहेनी, पांगरी, बासंबा, भिरडा, भिंगी, माळहिवरा, राहोली खु., वरूड गवळी, सावा, साटंबा, हिंगणी, जांभरुण तांडा, इंचा, सवड, दुर्गधामणी, आमला, भोगाव, भटसावंगी या ग्रामपंचायती आहेत. तर महिलांसाठी इसापूर, कानडखेडा बु., कानडखेडा खु., करंजाळा, खंडाळा, खरबी, डिग्रस कऱ्हाळे, चिंचोली, नवलगव्हाण, नांदुरा, पळसोना, पिंपरखेड, पारोळा, बोडखी, बोरजा, बोरीशिकारी, बोंडाळा, लासीना, वडद, वऱ्हाडी, वांझोळा, सावरखेडा, हिरडी, येळी, पारडा, कारवाडी, सागद, बेलुरा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचHingoliहिंगोलीElectionनिवडणूक