हिंगोलीत पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:11 IST2018-09-22T00:10:48+5:302018-09-22T00:11:04+5:30
शहरात शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. मागील महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाचे आज आगमन झाले. परिसरातील काही गावांतही पावसाच्या सरी कोसळल्या.

हिंगोलीत पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरात शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. मागील महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाचे आज आगमन झाले. परिसरातील काही गावांतही पावसाच्या सरी कोसळल्या.
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. मात्र आज सकाळपासून ढगाळ वातावरण असले तरीही दुपारच्या वेळी तुरळक भुरभुर वगळता पावसाचा पत्ता नव्हता. वसमत तालुक्यातील काही भागात असेच वातावरण होते. रात्रीच्या वेळी मात्र पावसाने जोर धरल्याने आज देखावे पाहण्यासाठी बाहेर निघालेल्या गणेशभक्तांची अडचण झाली.