भाजप आमदारांच्या निलंबनाचा हिंगोलीत निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST2021-07-07T04:36:59+5:302021-07-07T04:36:59+5:30
पाच जुलै रोजी विधान भवनात भाजपच्या आक्रमक आमदारांनी आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या आमदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत सभागृहात ...

भाजप आमदारांच्या निलंबनाचा हिंगोलीत निषेध
पाच जुलै रोजी विधान भवनात भाजपच्या आक्रमक आमदारांनी आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या आमदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत सभागृहात आपले मत मांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर केलेली ही कारवाई लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याचा आरोप भाजपच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. महाविकास आघाडीने ओबीसींचा तोंडाला पाणे पुसून त्याबद्दल जाब विचारल्याने मुस्कटदाबी चालवण्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, सरचिटणीस मिलिंद यंबल, फुलाजी शिंदे, प्रशांत सोनी, पप्पू चव्हाण, नारायण खेडेकर, कृष्णा रुहाटिया, उमेश नागरे, यशोदा कोरडे, संदीप वाकडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.