शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी अर्धनग्न आंदोलन करत शेतकरी निघाले मुख्यमंत्र्याच्या भेटीला, कर्जतला अडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 11:36 IST

सरसकट कर्जमाफीसाठी हिंगोलीतील ४० शेतकरी निघाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

- दिलीप कावरखे गोरेगाव (जि. हिंगोली) : राज्यातील सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी व इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील जवळपास ४० शेतकरी मंगळवारी मुंबईकडे दुपारी चार वाजता रवाना झाले आहेत. परंतु बुधवारी सकाळी या सर्व शेतकऱ्यांना कर्जत (रायगड) पोलिसांनी पुढील आदेशापर्यंत थांबवून घेतले आहे. 

११ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता नामदेव पतंगे व इतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. यानंतर दुपारी चार वाजता हे सर्व शेतकरी मुंबईकडे रवाना झाले. परंतु बुधवारी सकाळी या सर्व आंदोलक शेतकऱ्यांना कर्जत (जि. रायगड) येथे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत आपण मुंबईला जाऊ नका, असे पोलिसांनी सांगितले. परंतु जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होत नाही. तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.१२ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी आम्हाला थांबून घेतले असले तरी आम्ही घाबरणार नाहीत. आमचे आंदोलन यापुढेही सुरूच राहील, असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.  गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दशरथ मुळे, संजय मुळे, गजानन जाधव, प्रवीण मते, दीपक सावके, चंद्रकांत सावके, शांतीराम सावके आदीसह हिंगोली जिल्ह्यातील ४० ते ५० शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.

गोरेगावचे पोलिस मागावर...हिंगोली पासून मुंबईकडे निघालेले आंदोलक शेतकऱ्यांच्या मागावर गोरेगाव पोलीसही आहेत. जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या घेवून सरकारकडे जाणे गुन्हा आहे का ? आमच्याकडे कुठले शस्त्र नाही, अंगावर पूर्ण कपडे नाहीत. लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत असताना पोलिसांनी मागावर राहत ताब्यात घेऊन आंदोलन मोडीत काढण्याचे प्रकार नेहमीच होत आहेत.  - नामदेव पतंगे, आंदोलक शेतकरी, गोरेगाव

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीagitationआंदोलन