हिंगोलीत कर्जबाजारी शेतकर्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 18:59 IST2018-06-20T18:59:35+5:302018-06-20T18:59:35+5:30
जिल्हा बँकेचे कर्ज व खाजगी कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेने ग्रासलेल्या गोरलेगाव येथील एका वृद्ध शेतकर्याने आज सकाळी विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली.

हिंगोलीत कर्जबाजारी शेतकर्याची आत्महत्या
हिंगोली : जिल्हा बँकेचे कर्ज व खाजगी कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेने ग्रासलेल्या गोरलेगाव येथील एका वृद्ध शेतकर्याने आज सकाळी विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली.
कळमनुरी तालुक्यातील गोरलेगाव येथील रहिवाशी असलेले धोंडबाराव भगवानराव पतंगे (वय ८२) यांनी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पोत्रा शाखेतून शेतीसाठी ४०,००० रूपयांचे कर्ज घेतले होते. यासोबतच त्यांनी खाजगी कर्जही घेतलेले होते. त्याची परतफेड कशी करावी याच्याच ते चिंतेत असत. यातूनच आज सकाळी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून केले. हि बाब लक्षात येताच उपचारासाठी त्यांना कळमनुरी ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करत आहेत.