- इस्माईल जहागीरदारवसमत: हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात शनिवार, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवला. दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी भूगर्भातून मोठा आवाज आल्याने जमीन हादरली आणि पांग्रा शिंदेसह परिसरातील अनेक गावांमध्ये भूकंपाचा अनुभव आला.
गेल्या सहा ते सात महिन्यांनंतर पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी या तिन्ही तालुक्यांना सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत.
यापूर्वी गतवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तालुक्यात तीन वेळेस भूकंपाचे धक्के नोंदवले गेले होते. त्यानंतर काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा हा हादरा जाणवल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र वारंवार येणाऱ्या भूकंपाच्या घटनांमुळे नागरिक धास्तावले आहेत.
Web Summary : Vasmat, Hingoli experienced another earthquake tremor, causing panic in Pangra Shinde and surrounding villages. This follows previous tremors, raising concerns despite no reported damage.
Web Summary : हिंगोली के वसमत में फिर भूकंप के झटके महसूस किए गए, जिससे पांगरा शिंदे और आसपास के गांवों में दहशत फैल गई। पहले भी झटके आ चुके हैं, जिससे बिना किसी नुकसान की रिपोर्ट के चिंता बढ़ गई है।