शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
Daily Top 2Weekly Top 5

Hingoli: वसमत तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; अनेक गावांना पुराचा वेढा, शाळांना सुटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 10:51 IST

वसमत तालुक्यात गत २० दिवसांपासून अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे.

- इस्माईल जहागीरदारवसमत: तालुक्यात शुक्रवार रोजी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदी,ओढ्याला पुर आल्याने अनेक गावांत पाणी शिरले आहे. पूर परिस्थिती गंभीर असल्याने शिक्षण विभागाने शाळांना सुटी घोषित केली. खरिप पिकात गत २० दिवसांपासून पाणी साचलेले आहे. त्यामुळे पिके पूर्णतः हातची गेल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

वसमत तालुक्यात गत २० दिवसांपासून अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे. दरम्यान, २६ सप्टेंबर रोजीच्या रात्रीही तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदीओढ्याला पुर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील शेती पाण्यात गेली आहे. पाणी पातळी वाढल्याने आसना, उघडी नदीने उग्ररुप धारण केले आहे. 

तालुक्यातील किन्होळा गावात पुराचे पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचे पाणी जिल्हा परिषद शाळा, टोकाई विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय परिसरात शिरले असून गावातही पुराचे पाणी शिरले होते. बहिरोबा चोंडी,राजवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. सिरळी, कुरुंदा,लोन यासह अनेक गावांतील शाळांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळांना सुटी घोषीत केली आहे.

पुरामुळे तालुक्यात हाहाकार उडाला आहे. तालुक्यातील कुरुंदा गावात सतत पुर परस्थिती निर्माण होत आहे. पूर नियंत्रण मंजूर कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास सरपंच राजेश इंगोले यांनी मागणी केली होती. त्यानंतर आ. राजू नवघरे यांनी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे कामासंदर्भात कान टोचले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईने कुरुंदा येथील २०० ते २५० घरात पुराचे पाणी शिरुन नुकसान होत आहे.  ग्रामस्थांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तहसिलदार शारदा दळवी यांनी केले आहे.

कुरुंदा,किन्होळा येथे तहसिलदारांची भेट...किन्होळा, कुरुंदा या गावात पुराचे पाणी शिरले. राजवाडी, बहिरोबा चोंडी या गावांचा संपर्क तुटला, पूर परस्थितीवर प्रशासनाने नजर ठेवली आहे. नागरीकांना धिर दिल्या जात आहे, तहसिलदार शारदा दळवी यांनी तालुक्यातील गावांना भेटी देऊन नागरीकांना दिलासा दिला आहे.

डोणवाडा येथिल तलाव भरलातालुक्यातील डोणवाडा येथे असलेला लघु तलाव भरला आहे. तलावातून सुकळी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे.  त्यामुळे कुरुंदा नदी भरुन वाहत आहे. नदी काठावरील शेती खरडून गेली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Cloudburst in Hingoli's Vasmat causes floods; schools closed.

Web Summary : Vasmat, Hingoli experienced a cloudburst, flooding villages and disrupting life. Schools are closed due to the severe situation. Crop damage is extensive, hitting farmers hard. Authorities are on alert, and villagers are urged to take precautions as the Tahsildar visits affected areas.
टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊसfloodपूर