आठ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:45 IST2018-06-20T00:45:46+5:302018-06-20T00:45:46+5:30
जिल्ह्यातील विविध भागात नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या ८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जिल्हा शेतकरी आत्महत्या मदत समितीकडून मदत मंजूर करण्यात आली आहे.

आठ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील विविध भागात नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या ८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जिल्हा शेतकरी आत्महत्या मदत समितीकडून मदत मंजूर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्तांचे १२ प्रस्ताव जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर ठेवण्यात आले होते. यापैकी ८ प्रकरणे पात्र, २ अपात्र तर २ फेरचौकशी करून सादर करण्यास सांगण्यात आले आहे. मदतीसाठी कळमनुरी तालुक्यातील तुप्पा येथील पुंजाराव जगदेवराव देशमुख, सिंदगी येथील बालाजी रामराव मगर, गजानन तुकाराम मगर, हिंगोली तालुक्यातील माळधामणी येथील सोनाजी सोमाजी जाधव, सावरखेडा येथील अशोक विश्वनाथ लगड, सेनगाव तालुक्यातील देवानंद नाशिकेत भुक्तर व बोरखेडी येथील नारायण बळीराम जाधव या आत्महत्याग्रस्तांचे प्रस्ताव पात्र ठरले. त्यांच्या कुटुंबियांना लवकरच मदत प्रदान केली जाणार आहे. फेरचौकशीसाठी दिलेल्या प्रस्तावांची तालुका समित्यांनी व्यवस्थित छाननी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.