तीन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:26 IST2018-02-17T00:26:10+5:302018-02-17T00:26:14+5:30
तीन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या मदत समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तीन प्रस्ताव फेटाळले असून तीन प्रस्तावांत फेरचौकशीचा आदेश दिला आहे.

तीन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तीन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या मदत समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तीन प्रस्ताव फेटाळले असून तीन प्रस्तावांत फेरचौकशीचा आदेश दिला आहे.
या बैठकीत एकूण ९ प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी हिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथील अंकुश हलगे, वसमत तालुक्यातील गिरगावचे व्यंकट रामजी कºहाळे व रेवूळगावचे केशव लक्ष्मण हेडगे या तीन शेतकºयांच्या आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या आहेत. तर अन्य तीन प्रस्ताव अपात्र ठरले आहेत. याशिवाय तीन प्रस्ताव फेरचौकशी करून सादर करण्यास सांगण्यात आले.