शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस; भगवती, वरूडचक्रपानजवळील पुलावरून पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:50 IST

हिंगोली जिल्ह्यातील सहा मंडळांत अतिवृष्टी

हिंगोली : गुरुवारी रात्री शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील भगवती गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा व वरूडचक्रपान येथील कयाधू नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे दोन्ही पुलांवरील वाहतूक दुसऱ्या ठिकाणावरून वळविण्यात आली.

गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पिके माना टाकत होती. परिणामी शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला होता. ७ ऑगस्ट रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले व इतर छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आला, तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतशिवारात पाणी शिरले होते. परिणामी खरीप पिके पाण्याखाली गेली. हिंगोली शहरातील कयाधू नदीही भरून वाहत होती.

सहा मंडळांत अतिवृष्टीजिल्ह्यातील नर्सी नामदेव १०७ मिमी, कळमनुरी ७० मिमी, वाकोडी ११५.८ मिमी, नांदापूर ८७ मिमी, वारंगाफाटा ८३ मिमी, सेनगाव मंडळात ७४.८ मिमी पाऊस झाला.

भगवती गावाच्या पुलावरून पैनगंगेचे पाणी...कडोळी (जि. हिंगोली) : सेनगाव तालुक्यातील भगवती गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे पूर आला. त्यामुळे एसटी बस व इतर जड वाहनांना या ठिकाणावरून प्रवेशबंदी करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला होता. परिणामी, भगवतीजवळील जुन्या पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत होते. पुराची स्थिती पाहून लगेच जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली; परंतु मोटारसायकल, ऑटो रिक्षांना या ठिकाणावरून जाऊ दिले जात होते.

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीFarmerशेतकरी