शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; सरकारने भरपाई देण्याची रोहित पवारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 16:05 IST

यात्रेचा नागपूर येथे समारोप होणार असून असून त्या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेला काँग्रेसचे राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत

हिंगोली: सेनगाव  तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी. याकडे सरकारने काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे, अशी मागणी आ. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून केली. यात्रेचा नागपूर येथे समारोप होणार असून असून त्या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेला काँग्रेसचे राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आ. रोहित पवार यांनी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा सुरू केली.  यात्रा सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सेनगाव तालुक्यात दाखल झाली. यावेळी त्यांनी सेनगाव येथे पत्रकार परिषद घेऊन सेनगाव तालुक्यातील समस्या मांडून सरकारला धारेवर धरले. बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. मराठा समाजाच्या भावना दुखावणारे भाषण केल्यामुळे समाजात दुही निर्माण होत आहे. त्यामुळे अशी वक्तव्य करणे सत्ताधाऱ्यांनी टाळले पाहिजे, असे आवाहनही आ. पवार यांनी केले. 

पुढे ते म्हणाले, मराठवाड्यात युवा संघर्ष यात्रा दाखल झाल्यानंतर या ठिकाणी बहुतांश समस्या आढळून आल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नाही. त्यासाठी सेनगाव तालुक्याच्या एमआयडीसी उपलब्ध करण्याची गरज आहे. त्यावर सरकारने वेळीच लक्ष दिले पाहिजे. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे, अशी म आगणी आमदार पवार यांनी केली. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारHingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी