पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसला अन शस्त्राचा धाक दाखवून महिलेस लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 19:37 IST2022-02-12T19:36:35+5:302022-02-12T19:37:05+5:30

भुरट्या चाेरट्यांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे

He broke into the house under the pretext of drinking water and robbed the woman at gunpoint | पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसला अन शस्त्राचा धाक दाखवून महिलेस लुटले

पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसला अन शस्त्राचा धाक दाखवून महिलेस लुटले

नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील पहेनी येथील एका महिलेस शस्त्राचा धाक दाखवून दिवसाढवळ्या सोने, चांदीचे दागिने लुटून पोबारा केल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.

पहेनी -पुसेगाव रस्त्यावर पहेनीपासून जवळच असलेल्या शेतात सिंधू बालाजी घोंगडे ही महिला शेतातील घरामागे काम करीत असताना, याठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने पिण्यासाठी पाणी मागितले. महिला पिण्याचे पाणी आणण्यासाठी घरात गेली असता, सदरील व्यक्ती हा महिलेच्या मागे घरात येत शस्त्राचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तसेच हातातील चांदीचे दंडकडे असा ऐवज हिसकावून चोरटा घटनास्थळावरून पोबारा झाला.

या घटनेची माहिती मिळताच जमादार रामराव पोटे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नर्सी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जमादार पोटे यांनी सांगितले.

Web Title: He broke into the house under the pretext of drinking water and robbed the woman at gunpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.