दिव्यांग अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या; कर्णबधीर संघटनेतर्फे हिंगोलीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 13:08 IST2018-07-30T13:07:25+5:302018-07-30T13:08:12+5:30
चैन्नई येथे एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत हिंगोली जिल्हा कर्णबधीर असोसिएशन संघटनेतर्फे आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान आंदोलन करण्यात आले.

दिव्यांग अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या; कर्णबधीर संघटनेतर्फे हिंगोलीत आंदोलन
हिंगोली : चैन्नई येथे एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत हिंगोली जिल्हा कर्णबधीर असोसिएशन संघटनेतर्फे आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान आंदोलन करण्यात आले.
संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात चैन्नई येथे मुकबधीर मुलीवरील सामुहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने दिव्यांग सहभागी झाले होते. काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष गणेश पाईकराव, सचिव मो. इब्राहिम मो. इस्माईल यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.