सेनगावात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीत पंचायत समितीचे निम्मे कर्मचारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 18:51 IST2018-07-17T18:51:05+5:302018-07-17T18:51:59+5:30

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुमोड यांनी आज पंचायत समिती कार्यालयास अचानक भेट दिली.

Half of the Panchayat Samiti staff absent meeting with Chief Executive Officers in Senga | सेनगावात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीत पंचायत समितीचे निम्मे कर्मचारी गैरहजर

सेनगावात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीत पंचायत समितीचे निम्मे कर्मचारी गैरहजर

सेनगाव (हिंगोली ) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुमोड यांनी आज पंचायत समिती कार्यालयास अचानक भेट दिली. यावेळी कार्यालयातील निम्मे कर्मचारी गैरहजर असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. 

सेनगाव पंचायत समितीच्या कारभाराबद्दल अनेक तक्रारी आहेत.येथील अनागोंदी कारभाराचा प्रत्यय आज खुद जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुमोड यांना आला. आज सकाळी १०. ३० वाजेला त्यांनी पंचायत समिती कार्यालयास अचानक भेट दिली. यावेळी कार्यालयात केवळ सात कर्मचारी उपस्थित होते. दौर्यावरील कर्मचारी वगळता तब्बल २५ अधिकारी-कर्मचारी गैरहजर होते. याची नोंद उपस्थिती पटावर घेऊन डॉ. तुमोड यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

Web Title: Half of the Panchayat Samiti staff absent meeting with Chief Executive Officers in Senga