वसमत : शहरातील गुटखामाफियाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. नऊ सप्टेंबर रोजी पहाटे तब्बल साडेचार लाखाचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक 9 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वसमत शहरातील गुटखा विक्रेता अब्दुल मुखीद अब्दुल वहिद ( रा. शिवनेरी नगर, वसमत ) याच्या घरांमध्ये अवैधरित्या विमल ,वजीर, गोवा हा गुटखा साठवण्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केला होता.
पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार संभाजी लेकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, श्रीमती नाज पठाण यांच्या पथकाने छापा मारला. घरामध्ये साठवलेला साडेचार लाखाचा गुटखा जप्त करून आरोपी अब्दुल मुखिद अब्दुल वहिद यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन वसमत शहर येथे गुन्हा दाखल केला. आरोपी पोलिसांना पाहून घराच्या छतावरून पळून गेलेला आहे.
हेही वाचा - पुल गेला पाण्याखाली; गर्भवती महिलेने केला तराफ्यावरून थरारक प्रवास
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस जमादार संभाजी लेकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, प्रशांत वाघमारे, वसमतचे एएसआय सिद्दिकी, महिला पोलीस अंमलदार नाज पठाण, जमादार पोले यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - स्टंटबाजी तरुणांच्या अंगलट; पुराच्या पाण्यात उडी मारणाऱ्या दोघांना तहसीलदारांचे समन्स