हिंगोली शहरात पकडला १ लाख ८० हजारांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:06 IST2018-04-05T19:06:56+5:302018-04-05T19:06:56+5:30
शहरातील महावितरण कार्यालय समोर पोलिसांनी आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास कारवाई करून वाहनांतील १ लाख ८० हजारांचा गुटखा जप्त केला.

हिंगोली शहरात पकडला १ लाख ८० हजारांचा गुटखा
हिंगोली : शहरातील महावितरण कार्यालय समोर पोलिसांनी आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास कारवाई करून वाहनांतील १ लाख ८० हजारांचा गुटखा जप्त केला. आॅटोचालकास ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
हिंगोली शहरातील महावितरण कार्यालय परिसरातून आॅटोमध्ये गुटखा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती वाहतूक शाखेच्या पोलीस विभागाला मिळाली. यावेळी पोलिसांनी सापळा रचून आॅटोतून गुटखा वाहतूक करणा-या वाहनाची तपासणी केली. यावेळी विविध कंपनीचा आॅटोमध्ये १ लाख ८० हजार रूपयांचा गुटखा पोलिसांना आढळुन आला. सदर कारवाई वाहतूक शाखेचे सपोनि बळीराम बंदखडके व पथकाने केली. आॅटो हिंगोली शहर ठाण्यात उभा केला असून चालकासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबधित विभागाचे अधिकारी आल्यानंतर शहर ठाण्यात गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीसांनी सांगितले.