लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हिंगोली आॅफथॅलमालॉजीकल सोसायटी यांच्या वतीने निरंतर वैद्यकीय शिक्षण अंतर्गत ८ एप्रिल रोजी साई रिसॉर्ट अकोला बायपास येथे नेत्रशल्य चिकित्सकांचे एकदिवशीय चर्चासत्र सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत घेण्यात आले.सदर चर्चासत्रात विविध नेत्रांच्या आजारापासून ते त्यावरील उपचाराबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्टÑ आॅफथॅलमालॉजीकल सोसायटीचे राज्यध्यक्ष डॉ. प्रशांत बावनकुळे नागपुर हे होते. प्रमुख पाहुणे डॉ. सुवर्णकार, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. जयदीप देशमुख आदी उपस्थित होते. चर्चासत्रात डॉ. बावनकुळे व डॉ. रजत माहेश्वरी यांनी डोळ्यांच्या विविध आजार व त्यावरील उपचार पद्धत याबाबत सखोल माहिती दिली. सदर चर्चासत्र कार्यक्रमात हिंगोलीसह, वाशिम, परभणी व नांदेड येथील नेत्रशल्य चिकित्सक उपस्थित होते. चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन हिंगोली आॅफथॅलमालॉजीकल सोसायटीचे अध्यक्ष, डॉ. राजेश काबरा, डॉ. किशन लखमावार, डॉ. नीलेश गुंडेवार, डॉ. मृणालिनी माहुरकर, डॉ. पातूरकर, सुनील गुंडेवार व सदस्यांनी केले.
डोळ्यांच्या आजारांबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:31 IST