लग्न अवघ्या तीन दिवसांवर असताना नवरदेवाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 16:41 IST2019-02-20T16:40:51+5:302019-02-20T16:41:43+5:30
मन्मथ माळवटकर (२५) असे मृताचे नाव असून त्याच्या आत्महत्येचे अस्पष्ट आहे.

लग्न अवघ्या तीन दिवसांवर असताना नवरदेवाची आत्महत्या
कुरूंदा (हिंगोली ) : लग्ना अवघ्या तीन दिवसांवर असताना नवरदेवाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वसमत तालुक्यातील गिरगाव येथे उघडकीस आली. ही घटना सोमवारी (दि. १८) रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली. मन्मथ माळवटकर (२५) असे मृताचे नाव असून त्याच्या आत्महत्येचे अस्पष्ट आहे.
गिरगाव येथील मन्मथ माळवटकर (२५) या युवकाचा २१ फेब्रुवारी रोजी लग्न ठरले होते. लग्नासाठी सर्व तयारीही पूर्ण झाली होती. सर्व पाहूण्यांना निमंत्रणही दिले होते. लग्नास अवघे तीन दिवस शिल्लक होते. परंतु मन्मथने सोमवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान स्वत:च्या शेतात झाडाला गळाफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण अघाप स्पष्ट झालेले नाही. गजानन माळवटकर यांच्या माहिती वरुन कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली.