कळमनुरीत बीडीओंच्या विरोधात ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:54 IST2018-05-28T23:54:05+5:302018-05-28T23:54:05+5:30
येथील गटविकास अधिकारी ग्रामसेवकांना मानसिक व आर्थिक त्रास देत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यामुळे बीडीओंची विभागीय चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने २८ मे रोजी पं.स. कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.

कळमनुरीत बीडीओंच्या विरोधात ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : येथील गटविकास अधिकारी ग्रामसेवकांना मानसिक व आर्थिक त्रास देत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यामुळे बीडीओंची विभागीय चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने २८ मे रोजी पं.स. कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनाला जिल्हा परिषद कर्मचारी संघटना विस्तार अधिकारी संघटनेने पाठिंबा दिला. मागणी मान्य न झाल्यास उद्या २९ मे पासून ग्रामसेवक संघटना अहसकार आंदोलन पुकारणार आहे. बैठकांवरही बहिष्कार टाकण्यात येणार आहे. गटविकास अधिकारी सिंचन विहिरीची प्रशासकीय मान्यता परस्पर लाभार्थ्यांना देतात. ग्रामपंचायतीलाही बाब कळविल्या जात नाही. सिंचन विहिरीची मान्यता, अनुक्रमांकानुसार दिल्या जात नाही, गटविकास अधिकारी कार्यालयीन वेळेत दौरे दाखवितात. शौचालयांचा निधी पं.स.ला येवूनही ग्रा.पं.पर्यंत लाभार्थ्यांना देण्यात आला नाही. रोहयो कामाच्या प्रकरणात ग्रामसेवक पाईकराव यांना जवाबदार धरण्यात आले. मग्रारोहयोमध्ये नमुना क्र. ४ पं.स. ला सादर केल्यांतरही दोन-दोन महिने मस्टर निघत नाही. बैठकांना सकाळी ८ वाजताच बोलावतात. सेवा पुस्तिकेत लाल शाईने लिहिण्याची धमकी देतात, संचिका परिपूर्ण असून स्वाक्षरीसाठी मानसिक त्रास देतात. अपमानास्पद बोलतात आदी कारणावरून आदी कारणे दिली. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष शेख शैनोद्दीन, मठपती, लक्ष्मी केंद्रे, शिवाजी गवळी, आर.बी. घुगे, बिनगे, तांबडे, रमेश मोरे, मारोती काशिदे, दीपक काशिदे, शेख समीर आदी उपस्थित होते. तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे, सचिव राजेश किलचे यांनी भेट दिली. ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी दिवसभर धरणे देत होते.