दोन नगरसेविकांचे प्रस्ताव शासनाकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:46 IST2018-09-02T00:46:13+5:302018-09-02T00:46:31+5:30
अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण प्रकरणामुळे दोन नगरसेविकांच्या अपात्रतेचे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे दाखल आहेत. मात्र क.४२ (अ) अंतर्गतचे हे प्रस्ताव असल्याने अंतिम निर्णयार्थ विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दोन नगरसेविकांचे प्रस्ताव शासनाकडे?
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण प्रकरणामुळे दोन नगरसेविकांच्या अपात्रतेचे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे दाखल आहेत. मात्र क.४२ (अ) अंतर्गतचे हे प्रस्ताव असल्याने अंतिम निर्णयार्थ विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आधीच जातपडताळणीत काही जण हैराण आहेत. यापूर्वी काही जणांवर कारवाई झालेली आहे. विभागीय आयुक्तांकडून कुणी तर कुणी शासनाकडून दिलासा आणला आहे. मात्र सेनगाव येथील नगरसेविका अनुराधा सुतार यांनी मुख्याधिकाºयांना शिवीगाळ करून धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. शिवाय हे प्रकरण जिल्हाधिकाºयांकडे सुनावणीस आले होते. त्यानंतर कळमनुरी येथील नगरसेविका वनिता गुंजकर यांनीही एका कर्मचाºयास मारहाण केल्याने हे प्रकरणही पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर जिल्हाधिकाºयांकडे सुनावणीस आले. या दोन्ही प्रकरणांची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
ही प्रकरणे आता विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या दोन्ही नगरसेविकांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब होते की त्यांनाही संधी मिळणार हे आता शासनाच्या कोर्टात दिसत आहे.