गोडतेलाने दीडशेचा टप्पा गाठल्याने फोडणी करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST2021-04-17T04:29:16+5:302021-04-17T04:29:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कौठा : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे सतत टाळेबंदीची टांगती तलवार आहे. सर्वसामान्य ...

Godtela reached the stage of one and a half hundred and exploded | गोडतेलाने दीडशेचा टप्पा गाठल्याने फोडणी करपली

गोडतेलाने दीडशेचा टप्पा गाठल्याने फोडणी करपली

लोकमत न्यूज नेटवर्क

कौठा : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे सतत टाळेबंदीची टांगती तलवार आहे. सर्वसामान्य माणूस त्रस्त असताना पुन्हा एकदा जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. गोडतेलाने दीडशेचा टप्पा गाठल्याने फोडणीला तेलही मिळेना झाले आहे.

किराणा बाजारात सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने गृहिणींचे गणित कोलमडले आहे. प्रत्येक घरातील कमावत्या व्यक्तीचे आर्थिक समीकरणही बिघडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून सतत खाद्यतेलाचे भाव वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी गोडतेल शंभर रुपये झाल्याने चिंता व्यक्त होत होती. आता तर ग्रामीण भागात खाद्यतेलाने दीडशेचा टप्पा गाठल्याने सर्वसामान्यांना तेल मिळणेही अवघड होऊन बसले आहे.

दररोज खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी खाद्यतेल महत्त्वाचा घटक आहे. तळण पदार्थ टाळले तरी भाजीची फोडणी व चपातीसाठी गोडतेल आवश्यक आहे. सद्यस्थितीत सोयाबीन ठोक भाव १४५ ते १४८ रुपये झाल्याने ग्रामीण भागात सरासरी प्रतिकिलो भाव दीडशे रुपये झाला आहे. साखर ३६ रुपये ते ४० रुपये किलो, शेंगदाणे ११० ते १२० रुपये किलोने विकले जात आहेत. चहापत्ती ३९० ते ४२० रुपये प्रतिकलो दराने विकली जात आहे. त्यामुळे महागाईच्या काळात चहा पिणेसुद्धा न परवडणारे झाले आहे.

प्रतिक्रिया:

खाद्यतेलासह एकूण होत असलेल्या भाववाढीबाबत गृहिणी आपला रोष व्यक्त करत आहेत. गोडतेल दीडशे रुपये झाले आहे. त्यामुळे सर्व गणित बिघडले आहे. महागाईने कळस गाठला आहे. खाद्यतेलाचे भाव कमी होणे गरजेचे आहे.

- शांताबाई ज्ञानदेव खराटे, कौठा

Web Title: Godtela reached the stage of one and a half hundred and exploded