लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:57 IST2018-08-29T00:55:50+5:302018-08-29T00:57:04+5:30

येथील प्रभाग १ चा भाग असलेल्या गलांडीत अविवाहित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून सतत अत्याचार केल्याची घटना घडली असून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 Girl abuse on girl marriage | लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ: येथील प्रभाग १ चा भाग असलेल्या गलांडीत अविवाहित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून सतत अत्याचार केल्याची घटना घडली असून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिल चव्हाण याने गावातीलच १९ वर्षीय मुलीला लग्न करतो म्हणून सतत ९ महिन्यांपासून अत्याचार केला. यातून तिला आठ महिन्याचा गर्भधारणा झाल्याचे लक्षात आले. मुलाने लग्नास नकार दिला व घरच्यांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. गुन्हा दाखल करून मुलीला रूग्णालयात वैद्यकीय तपासणीस पाठविले आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोनि वाघमारे, दत्तात्रय बागल, शेख एकबाल, भीमराव चिंतारे, बंडू घुगे यांचे पथक तयार केले आहे.
दंड वसूल
हिंगोली - अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. ७ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करून ३ हजार २०० रूपये दंड वसूल केला. विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्यात आली.

Web Title:  Girl abuse on girl marriage