मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:23 IST2020-12-25T04:23:58+5:302020-12-25T04:23:58+5:30

हिंगोली : जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील चोरीच्या मोटारसायकल चाेरणारी टाेळी पाेलिसांनी पकडली आहे. त्यांच्याकडून विविध जिल्ह्यात चाेरी केलेल्या २३ माेटारसायकल ...

A gang of motorcycle thieves has gone missing | मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड

मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड

हिंगोली : जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील चोरीच्या मोटारसायकल चाेरणारी टाेळी पाेलिसांनी पकडली आहे. त्यांच्याकडून विविध जिल्ह्यात चाेरी केलेल्या २३ माेटारसायकल अंदाजे १५ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत चाेरट्यांना अटक करण्यात आली आहे.

वसमत पोलीस ठाणे येथे २३ डिसेंबर रोजी मोटारसायकल चोरी संदर्भात गोपनीय माहिती मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि एस. एस. घेवारे,पोउपनि के. डी. पोटे यांच्या पथकाने वसमत पाेलीस ठाणे हद्दीतील गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून चोरीच्या मोटारसायकल चोरी करणारे तसेच त्या मोटारसायकल विकत घेणाऱ्यांची माहिती मिळाली. त्यानंतर पाेलिसांनी वसमत येथील आरोपी शेख मुर्तझा शेख मन्नान वय २१ वर्षे रा. शुक्रवार पेठ वसमत, उमेरखा उर्फ हाजी बिस्मीलाखॉन वय २१ वर्ष, रा. कोहिनूर कॉलनी वसमत, शेख अझर शेख दिल्लू वय २६ वर्ष, रा. जितवान नगर आखाडा बाळापूर व त्यांचे इतर दोन साथीदार यांना ताब्यात घेतले. त्यांनी चाेरी केलेल्या मोटारसायकल वसमत व आखाडा बाळापूर येेथे विक्री केलेल्या असल्याबाबत खात्री झाल्यावरुन या आरोपीच्या ताब्यातून हिंगोली, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातील चोरी केलेल्या व त्यांचे घरासमोर लावण्यात आलेल्या मोटारसायकल ताब्यात घेतल्या. याबाबत त्यांच्या ताब्यात बाळगलेल्या मोटारसायकल बाबत कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देत नसल्याने ही चोरी किंवा लबाडीने मिळवल्याची खात्री झाली. तसेच यानंतर आरोपींना विश्वासात घेऊन त्यांनी वसमत शहर व बाळापूर येथे मोटारसायकलचे कागदपत्रे नंतर देतो असे खोटे सांगून विक्री केलेल्या इसमांकडून जप्त करण्यात आल्या. सदरच्या मोटारसायकलबाबत त्यांना अधिक विचारपूस करता त्यांनी कुरूंदा, जवळा बाजार, बाळापूर, भोकर, औरंगाबाद येथून मोटारसायकल चोरी करुन विक्री केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. नमूद आरोपींनी एकूण २३ मोटारसायकल किंमती अंदाजे १५ लाख रुपये किंमतीच्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपींकडून हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील अधिक चोरीच्या मोटारसायकल मिळण्याची शक्यता आहे. तसेच पोस्टे वसमत ग्रामीण येथे मागील पाच वर्षांपासून फरारी आरोपी नामे निहाल उर्फ बंगा बालाजी डोईजड वय २१ वर्ष रा. कोहिनूर कॉलनी वसमत हा मिळून आला आहे. कारवाईतील अधिकारी व कर्मचारी यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत त्यांचे कौतुक केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे. पोउपनि एस.एस. घेवारे, पोउपनि के. डी. पोटे, बालाजी बोके, संभाजी लेकुळे, भगवान आडे, विलास सोनवणे, शंकर जाधव, विशाल घोेळवे, विठ्ठल कोळेकर, सुनील अंभोरे, किशोर कातकडे, आशिष उंबरकर, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, आकाश टापरे, विठ्ठल काळे, प्रशांत वाघमारे, तुषार ठाकरे यांनी केली आहे.

Web Title: A gang of motorcycle thieves has gone missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.