टोळीने गुन्हे करणाऱ्या ५ आरोपींना दोन वर्षांसाठी केले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST2021-02-05T07:54:06+5:302021-02-05T07:54:06+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील पोलीस स्टेशन वसमत शहर येथे २१ जानेवारी रोजी गंभीर गुन्हे टोळीने करणाऱ्या एकूण ५ आरोपींना पोलीस ...

The gang deported 5 accused for two years | टोळीने गुन्हे करणाऱ्या ५ आरोपींना दोन वर्षांसाठी केले हद्दपार

टोळीने गुन्हे करणाऱ्या ५ आरोपींना दोन वर्षांसाठी केले हद्दपार

हिंगोली : जिल्ह्यातील पोलीस स्टेशन वसमत शहर येथे २१ जानेवारी रोजी गंभीर गुन्हे टोळीने करणाऱ्या एकूण ५ आरोपींना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी २ वर्षांकरिता हिंगोली जिल्ह्यातून हद्दीपारीचे आदेश निर्गमित केले आहेत.

वसमत शहर पोलीस ठाणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावातील टोळी प्रमुख रेशमसिंग रतनसिंग चव्हाण व सदस्य रणजितसिंग रतनसिंग चव्हाण, किरणसिंग रतनसिंग चव्हाण, जोगिंदरसिंग रणजितसिंग चव्हाण, नानकसिंग ऊर्फ राजूसिंग पि. गुरुपालसिंग ऊर्फ चव्हाण, सर्व रा. शिकलकरी वस्ती, रेल्वेस्थानक रोड, वसमत यांना हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीबाहेर काढून देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कलासागर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ (१) प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, विलास सोनवणे यांनी केली आहे. ३० डिसेंबर रोजी पोलीस ठाणे वसमत शहर व पोलीस ठाणे हट्टा हद्दीतील एकूण ११ आरोपींना हिंगोली जिल्ह्याबाहेर दोन वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश निर्गमित केले आहेत व यापुढेही हिंगोली जिल्ह्यात असे टोळीने गुन्हे करणाऱ्या जास्तीत जास्त गुन्हेगारांविरुद्ध हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक कलासागर यांनी सांगितले.

Web Title: The gang deported 5 accused for two years