चर्मकार समाजातर्फे मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:45 IST2018-09-14T23:45:09+5:302018-09-14T23:45:36+5:30

राष्टÑीय चर्मकार महासंघ जिल्हा शाखेतर्फे १४ सप्टेंबर रोजी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले.

 Front by the Charmakar Samaj | चर्मकार समाजातर्फे मोर्चा

चर्मकार समाजातर्फे मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्टÑीय चर्मकार महासंघ जिल्हा शाखेतर्फे १४ सप्टेंबर रोजी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले.
भारतीय संविधानाच्या प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. तसेच चर्मकार समाजाचे कुलदैवत गुरू रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी, संत रविदास चर्माेद्योग व चर्मकार विकास महामंडळाची सर्व कर्ज माफ करावेत. महामंडळाला नवीन भाग भांडवल उपलब्ध करून द्यावे यासह विविध माण्यांचे निवेदन शासनाकडे सादर करण्यात आले.

Web Title:  Front by the Charmakar Samaj