नव्याने चार रुग्ण आढळले; १५ जण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:30 IST2021-01-25T04:30:58+5:302021-01-25T04:30:58+5:30

हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा, सेनगाव परिसरात ८१ जणांची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला ...

Four new patients were found; 15 people are fine | नव्याने चार रुग्ण आढळले; १५ जण बरे

नव्याने चार रुग्ण आढळले; १५ जण बरे

हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा, सेनगाव परिसरात ८१ जणांची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही, तर कळमनुरी परिसरात आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आली यामध्ये चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तसेच हिंगोली आयसोलेशन वाॅर्डातील १५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत ३ हजार ६९५ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ३ हजार ५५४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या ८५ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तसेच एका रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Web Title: Four new patients were found; 15 people are fine