कोरोनाचे नवे चार रुग्ण; १३ बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST2021-06-16T04:39:19+5:302021-06-16T04:39:19+5:30

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली २९, वसमत २०, सेनगाव १३९, औंढा ७०, कळमनुरी १२७ अशा ३९५ अँटिजन चाचण्या केल्या. यात एकही ...

Four new patients with corona; 13 Good | कोरोनाचे नवे चार रुग्ण; १३ बरे

कोरोनाचे नवे चार रुग्ण; १३ बरे

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली २९, वसमत २०, सेनगाव १३९, औंढा ७०, कळमनुरी १२७ अशा ३९५ अँटिजन चाचण्या केल्या. यात एकही बाधित आढळला नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात २३ पैकी हिंगणी १, पांगरी २ असे तीन रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात ७ पैकी गोरेगावात एक रुग्ण आढळला, तर औंढा परिसरात ८८ पैकी एकही बाधित आढळला नाही. आज बरे झाल्याने १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयातून ८, सेनगावातून २ तर कळमनुरीतून तिघांना घरी सोडले.

आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १५ हजार ८८५ रुग्ण आढळले. यापैकी १५ हजार ४३१ बरे झाले. सध्या ७६ जणांवर उपचार सुरू आहेत, तर ३७८ जणांचा मृत्यू झाला. सध्या दाखल असलेल्यांपैकी १४ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर ८ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: Four new patients with corona; 13 Good